*IT employee* कॉन्फरन्स रूममध्ये, एचआर विभागामधली सर्वात अनुभवी *ती* आणि कंपनीत आपल्या तंत्रज्ञानाच्या ज्ञानामुळे दबदबा असलेला *तो* '‘एक्झिट इंटरव्ह्य़ू’' साठी, म्हणजे राजीनामा देऊन कंपनीतून बाहेर पडण्यापूर्वी घेतल्या जाणाऱ्या मुलाखतीसाठी समोरासमोर बसले होते. *विषयाला थेट हात घालत ती म्हणाली, ‘‘कंपनीतल्या उत्तम ‘परफाॅर्मन्स’ असणाऱ्या लोकांपैकी तू एक आहेस; पण शेवटी निर्णय तुझा आहे.. मात्र ‘तडजोडी’ ची काहीही जरी शक्यता असली तर तुला दुसऱ्या कंपनीने दिलेली ‘ऑफर’ सांग. आम्ही ती ‘ऑफर’ आमच्याकडून देऊच.. पण त्याच बरोबर नवीन ऑफरच्या वीस टक्के रक्कम तुला ‘स्पेशल बोनस’ म्हणूनही देऊ.’’* त्यावर दीर्घ श्वास घेत तो म्हणाला, *‘'मी हे अगोदरच सांगितलंय की, माझ्याकडे दुसरी कोणतीही ऑफर नाही.* _*‘नोकरी सोडणं’*_ *इतकाच माझा उद्देश आहे. त्यामुळेच आपला ‘नोटीस पीरियड’ ही मी कोणतंही कारण न देता पूर्ण केला. शिवाय माझी कंपनी किंवा कंपनीतल्या माणसांबद्दलही काही तक्रार नाही.’’* पण ती मागे हटणार नव्हती. आपली पुढची ‘ऑफर’ त्याच्यासमोर ठेवत म्हणाली, ‘‘तू अजून महिनाभर थांब. एक नवीन ‘प्रोजेक्ट’ येतोय. त्यासा...