कविता
पाऊस कोसळे हा अंधारले दिसे
डोळे भरून आले माझे असे कसे
गेल्या बुडून वाटा गेली बुडून राने
झाले उदास माझे गाणे असे कसे
या पावलास लाटा ओढून खोल नेती
हे प्राण ओढ घेती माझे असे कसे
का सांग याद येते एकांत हा सभोती
हे सूर डोह होती माझे असे कसे ??
-मंगेश पाडगांवकर .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा